चिन्हांकीत लेखन

चिन्हांकित लेखन,


माझ्या दुसऱ्या, चित्रांकीत लेखन या चर्चेत माझा असा ग्रह झाला की किमान काही मित्र या तत्सम विषयात गंभीर चर्चेची अपेक्षा ठेवतात. मनोगतींनी आधीच्या अशाच विषय चर्चांकडे केलेलं दुर्लक्ष विसरून अजून एक नवीन चर्चा प्रस्ताव ठेवतो आहे. बघूयात कसा प्रतिसाद मिळतो ते.


तर मंडळी आपल्या पैकी बरेच जण अभारतीय भाषांमध्येही कौशल्य बाळगून आहेत, आणि मी असं ऐकून आहे की अभारतीय भाषांतील काही उच्चार देवनागरी लिपीत लिहिणे अवघड जाते.तर देव नागरी लिपी च्या मुख्य नियमांत राहतंच  थोडं अधिक स्वातंत्र्य म्हणजे देवनागरीला जुळतील अशी नवीन  चिन्हे वापरून देवनागरीस नवीन उच्चार लिहून दाखवायचे.


नियम:-



  • नवीन अक्षर वापरावयाचे झाल्यास शक्यतो त्यास किमान एक अर्धी किंवा पूर्ण उभी दांडी असावी.
  • शीर्ष रेषा देता आली पाहिजे.
  • शक्यतो ब्राम्ही लिपीच्या कक्षेत बसणारी अक्षरे अक्षर चिन्हे वापरावीत
  • युनिकोड बद्दल माहिती असल्यास त्याची कक्षासुद्धा सांभाळण्याचा प्रयत्न करावा
  • शक्य असेल तर संबंधित उच्चारणांची ध्वनी संचिका (ऑडिओ फाइल) सुद्धा आंतरजालावर उपलब्ध करावी
  • मराठी लेखनास अनुसरून वाटले पाहिजे.

  • नविन उच्चारण स्वर आहे का व्यंजन आहे ते नमुद करावे

  • ते ऱ्हस्व आहे का दीर्घ उच्चारण आहे ते नमुद करावे

  • उच्चारणांचे त्या भाषेतील किमान दोन शब्द सध्या कसे लिहिता आणि वेगळ्या नवीन पद्धतीने कसे लिहिता येतील ते लिहून दाखवावेत 

 


तर यात माझा स्वार्थ नवीन उच्चारणांची माहिती करून घेऊन स्वतःच्या ज्ञानात भर घालणे असा आहे.


-विकिकर