मी जगतो...

नमस्कार मित्रहो


आज फार दिवसांनी मनोगतावर काहीतरी लिहीत आहे.. गोड मानून घ्या...


सतत कुठल्यातरी भीतीच्या राज्यात मी जगतो
मनातल्या आरशात डोकावून मलाच मी बघतो


रोज सकाळी काहीतरी ठाम ठरवून मी निघतो
काल झालेल्या चुकांचं माप पदरात पडावं मागतो


डोळ्यांसमोर माझं उज्ज्वल भविष्य मी बघतो
माझ्या कोरड्या अश्रुंबरोबर मग मीही धगधगतो


कधीतरी संपेल ही काळरात असं मलाच सांगतो
वेड्या विश्वासाने माझा मीच मनात झगमगतो


आनंदी (:D)