मी अन तु

काल तू स्वप्नात आलीस् म्हणालीस ! 
जीवनाचे रंग आणणार होतास् तु.


गेला तो,परतलाच नाहीस.


कसं सांगू तुला,
भौतिक ऐश्वर्याच्या बाजारात
मला तुझ्यासाठी,
काहीच होता आलं नाही.


अन् तेव्हा तूच 
अलगदच,


तुझ्या पाऊलखूणा माझ्यावर ठ्सवून.
पक्षांच्या थव्यांबरोबर.
दूर निघून गेलीस.