मरणाचा अर्थ

२००२ च्या आसपास लिहिलेलि कविता... युद्ध, नैसर्गिक आपत्ती ई. चा संदर्भ


पुन्हा उध्वस्त। मनं आणि घरं। घायाळ शरीरं। चहू ओर॥


असणे क्षणात। क्षणात नसणे। कोडे जीवघेणे। सोडवा हो॥


वेदनेचा पूर। जड जड ऊर। मन सैरभैर। क्षणभर॥


खिन्न सायंकाळी। चित्त काहूरले। प्रश्न आदळले। प्रश्नांवर॥


कसे फ़क्त आम्ही। उसासे सोडले। आकडे टाकले। दहावीस॥


कशी सोयीस्कर। माझी माणुसकी। आणि बान्धिलकी। वगैरे वगैरे॥


हाच लावला मी अर्थ जगण्याचा? सराव मरण्याचा। चालू राहो॥


लौकिकार्थाने। किति लोक गेले। अन काहि मेले। माझ्यापरि॥