८१. वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे

८१. वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फुल पाने ॥धृ.॥

रंग हे नवे, गंध हे नवे
स्वप्न लोचनी वाटते हवे
हा निसर्ग भासे, विश्वरुप लेणे ॥१॥

या निळया नभी, मेघ सावळे
कल्पनेस मी पंख लाविले
झेलते पिसावरी, हे सतेज सोने ॥२॥

आज वेड हे कुणी लाविले ?
अंतराळी का पडती पाऊले ?
कशी सोडवू मी सुखाचे उखाणे ? ॥३॥

गीतकार     :जगदीश खेबुडकर
गायक     :लता मंगेशकर
संगीतकार     :पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट     :संसार (१९८०)