८२. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम

८२. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम
विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम ॥धृ.॥

कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी
जन्मभरीच्या श्वासाइतुके, मोजियले हरी नाम ॥१॥

बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संता घरचा
हाच तुक्याचा विठठल आणि दासाचा श्रीराम ॥२॥

जितुके मालक, तितकी नावे, हृदये जितकी याची गावे
कुणी न ओळखी तरीही याला, दिन अनाथ अनाम ॥३॥

गीतकार     :ग. दि. माडगुळकर
गायक     :आशा भोसले, सुधीर फडके
संगीतकार     :सुधीर फडके
चित्रपट     :जगाच्या पाठीवर (१९६०)