माझ्या काही चारोळ्या १

इथे मला प्रत्येक जण,


हुशारीच्या चौकटींत बसवतो,


हेच तर त्याचं चुकतंय कारण,


मी त्यांना नेहमीच फसवतो.


________________________________________


 


बुडल्यावर दुःखात,


माणसांची पाठ फिरली.


माणूसच काय .... पण अंधारात


सावलीनेही साथ सोडली.