माझ्या काही चारोळ्या २

पृथ्वीचे सौंदर्य, सूर्याने पाहिले,


किरणांनी त्याने तिला ओवाळिले,


लाजून पृथ्वी चंद्रामागे धावली,


चंद्राची सावली तिने सूर्यांवर पाडली!


____________


का ? कोण जाणे ?


ऐकून ते धुंद गाणे,


ढगांनाही आले दाटून


बरसले ते मनापासून!!


____________