पापाचा घडा भरला आहे पण,
निर्वाणीचा दूर आहे तो क्षण,
देवंही आता गप्प बसलाय,
नऊ अवतारां नंतर धास्तावलाय !!!!
_________________________
समुद्र किनारी,
बघताना सूर्याचा अस्त...
आगीच्या गोळ्याच
पाण्यात विरघळणं दिसत!!!
________________________
माणसानं देताना,
ढगानं सारखं व्हावं,
बरसताना स्वतः
विरघळून जावं. !!!!