मेतकूट भात (वेगळा प्रकार)

  • बासमती तांदुळ- २ वाट्या
  • मेतकुट - ३ चमचे
  • फोडणीसाठी तेल,मोहरी,जीरे
  • लिंबु- १
  • चवीनुसार मीठ, तिखट
  • साखर- अर्धा चमचा
३० मिनिटे
२-३

भात मोकळा शिजवून घ्यावा. भाताची वाफ गेल्यावर(पण भात गरम असावा) चमच्याने शिते मोकळी करावीत,त्यावर मेतकूट,तिखट,मीठ,साखर घालावे,दुसऱ्या  पातेल्यात फोडणी करून,ही फोडणी भातावर घालावी,लिंबू पिळावे व सर्व एकत्र करावे.

 

नेहमीच्या मेतकूट-दुधभात,मेतकूट-तूपभात पेक्षा हा वेगळा प्रकार असुन मेतकूटाची खमंग,तिखट व लिंबामुळे थोडा आंबट छान लागतो, आणि झटपट तयार होतो.

अलकाताई