शोकांतिका

युगपुरुषांनो,


    तुम्ही जेव्हा सारा आसमंत उजळून टाकत होतात तेव्हा,


    तुमच्या मागे येणाऱ्या गर्दीत अंधाराचे कंदील वाटले जात होते.


तुमच्यानंतर,


   आज त्यातलाच एकेक कंदील पेटतो आहे, आणी -


   त्याखाली पसरतो आहे,


   आदिम अमानुष अंधार!