आणि तो तिथून बाकी काहीही न बोलता बाहेर पडला आणि कॉलेज जवळच्या 'मधुसूदन' मध्ये आला..........
अजून शाल्वी आली नव्हती. तो माडीवर जाऊन खिडकीशेजारच्या टेबलवर बसला. मनात असंख्य विचार होते. 'आताच शाल्वीला विचारावे का? काय म्हणेल ती? नकार देईल का? का ती सुद्धा माझ्यावर प्रेम करते? पण मग तसे असते तर काहीतरी बोलली असती. का फक्त एक मित्र म्हणून पाहते ती माझ्याकडे? का तिचे तिथेच लंडनमध्ये कोणाशीतरी..... छे छे !!! काहीतरीच....'
"हाय! राज.... lookig smart and handsome." - शाल्वीच्या आवाजाने राज् एकदम भानावर आला.मनातले सगळे विचार झटकून टाकले.
"ओह! शाल्वी, तू पण काही कमी सुंदर नाही आहेस..ये ना..have a seat, come on." - राजचा चेहरा एकदम खुलला.
"कसा आहेस?? आता काय बाबा.. तू सुद्धा आकाशगंगा बिल्डर्स चा मेंबर झालास. मजा आहे."- शाल्वी.
"कसली गं आलीय मजा.. कामाच्या व्यापातून् डोकंच वर निघत नाही. माझं सोड गं, तू बोल .. काय म्हणतंय लंडन..?? जम बसला का तुझा आता..?" - राज.
"हो.. थोडा थोडा." -शाल्वी.
तिला आताच विचारावे... राजने विचार केला.
"आबाकाका, २ कॉफी द्या प्लीज." - राजने नेहमीच्या वेटरला सांगितले. वेटरला सुद्धा काका म्हणून हाक मारणाऱ्या राजचे शाल्वीला नेहमी कौतुक वाटे. आजही ते भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले आणि राजने ते पाहिले.. तिने लगेचच आपले लक्ष नाही असे दाखवण्यासाठी आपली मान वळवली. वेटर कॉफी ठेवून् गेला. राज ने शाल्वीला कॉफी दिली आणि स्वतः:ही घेतली.
"शाल्वी एक विचारू का?" - राजने विषयाची सुरुवात केली.
"बोल ना!" - गरम गरम कॉफीचा एक घोट घेऊन शाल्वी म्हणाली.राज शब्दांची जुळवाजुळव करू लागला.
"आपण कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून...." "हाय शाल्वी!" एकदम असा आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले तर एक मुलगी त्या दोघांच्या टेबलकडे चालत येताना दिसली.
"ओह हाय! राज, ही माझी मावस बहीण.. दिव्या. हिला मी एकडेच् ये म्हटले.. अरे, आम्हाला दोघींना शॉपिंगला जायचे आहे. तुला भेटून् आम्ही परस्परच जाऊ" - शाल्वी.
"हाय दिव्या!" - राज. "हाय!" - दिव्या.
" ओ.के. पण राज तू काहीतरी बोलत होतास..कॉलेजमध्ये काय म्हणालास?" - शाल्वी.
"काही नाही. नंतर कधीतरी बोलू आपण. आता तुम्ही शॉपिंग करून् या. आपण परत भेटूच. ओ.के. "- राज.
"ओ.के. मग परत कधी भेटशील... ए, नाहीतर असं करूया का.. आपला सगळा ग्रुप मिळून् कुठेतरी फिरायला जाऊया का? मजा येईल." - शाल्वी.
"ठीक आहे. मी बघतो कोण कोण भेटतंय ते आणि मग ठरवून कळवतो तुला."- राज्.
"चल मग निघते मी. मला नक्की कळव. बाय!" - शाल्वी.
"हो. नक्की. उद्या फोन करतो तुला. चल बाय."- राज.
शाल्वी निघून गेली. राजने एक दीर्घ सुस्कारा सोडला. आजचा बेत फसला तर! पुढे बघू. असे म्हणून् राज् उठला आणि कॉफीचे बिल देऊन बाहेर पडला आणि तडक घरी आला.
नेहमी ऑफिसानंतर पूल खेळायला जाणारा हा राज.. आज घरी लवकर आला होता.
"राज, काय झाले? शाल्वी ला भेटलास का? विचारलंस का तिला? काय म्हणाली ती?" - सुवर्णाताई.
"हो.. भेटलो तिला पण विचारू नाही शकलो." - राज.
"राज, असं करून् कसं चालेल? अरे, किती दिवस असा तू कुढत राहणार आहेस? कधीतरी तुला हिंमत करवीच लागेल ना? तुला कधीतरी सत्याला सामोरं जावंच लागेल." - सुवर्णाताई त्याला समजावत होत्या.
पण राजला आता, ट्रीप ऍरेंज करायचे वेध लागले होते. खंडाळ्याला जायचे सगळ्यांना घेऊन आणि संधी पाहून् शाल्वीला विचाराचे.. असे त्याने ठरवले. त्याच्या शब्दाला मित्रमंडळींपैकी कोणीही नाही म्हणणार नाही याची त्याला खात्री होती. सगळी जमवाजमव झाली. त्याने सगळीकडे फोन केले. एक मिनी बस बुक केली. शाल्वीला तसे कळवले. येणाऱ्या शनिवारी सकाळी लवकर निघायचे ठरले.
मधल्या २-३ दिवसांत तो शाल्वीला फोन करायला विसरला नव्हता. शनिवार केव्हा येईल असे झाले होते. आणि मग शनिवार उजाडला. ठरलेल्या ठिकाणी सगळे जमले. बस आली, सगळे बसमध्ये चढून् आपापल्या सीटवर बसले... प......ण......! शाल्वी एकदम पुढे बसली होती आणि राजला एकदम पाठीमागची सीट मिळाली होती. म्हणजे बसमध्ये विषय काढायचा प्रश्नच मिटला... राज थोडा नाराज झाला. पण अजून अख्खा दिवस आहे हातात... अशी त्याने स्वतः:ची समजूत घातली.
संपूर्ण ट्रीपमध्ये राज आणि शाल्वी खूप कमी वेळेला दोघेच असे एकत्र आले.शाल्वी बरोबर नेहमी कोणी ना कोणी तरी असे. त्यामुळे राजला तिच्याशी बोलायची संधी मिळत नव्हती. शाल्वी मात्र खूप खूश होती. खूप दिवसांनी सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटल्यामुळे एकदम आनंदात होती. राज मात्र तिच्याशी बोलायसाठी धडपडत होता. पूर्ण दिवस संपला.. परतीची वेळ झाली पण राजला तिच्याशी बोलता नाही आले. रात्री उशिरा सगळे परतले. राजही कंटाळून गेला होता. अंथरुणावर पडल्या पडल्या त्याला झोप लागली.
सकाळी उठल्यावर सुवर्णाताईंनी त्याला नाश्त्यासाठी हाक मारली. नाश्त्याच्या टेबलवर डी.के.आणि सुवर्णाताई बसले होते. त्याने आईकडे पाहिले. त्यांनी नजरेनेच त्याला "काल काय झाले?" असे विचारले. त्यानेही मानेनेच "काहीच नाही" म्हणून सांगितले. डी.के. ना यातील काहीच कल्पना नव्हती. आणि कल्पना असती तर.... बापरे!!!!!!!
दिवस पुढे पुढे सरकत होते. जसा शाल्वीचा परत जायचा दिवस जवळ जवळ येत होता तसा राज अस्वस्थ होत होता. त्याला डि.कें. च्याकडे विषय काढावा असे एकदा वाटे पण ते कितपत समजून् घेतील याची त्याला शंकाच होती. तो मधल्या दिवसांमध्ये १-२ वेळा शाल्वीला भेटला सुद्धा पण काहीतरी कारण व्हायचे आणि मग तो विषय निघायचाच नाही. राजला आता स्वतः:च्या बुजरेपणाची लाज वाटू लागली. काय करावं काही सुचत नव्हतं.
त्यात आणखी भर म्हणून् की काय.. तो आईशी एकदा या विषयावर बोलताना.. अचानक डी.के. तिथे आले आणि त्यांनी मायलेकांचे बोलणे ऐकले......... झाले..! तो पूर्ण दिवसभर राजला पैसा किती महत्त्वाचा हे ऐकून घ्यावे लागले. आणि शेवटी, शाल्वीचा विचार डोक्यातून काढून टाक अशी सक्त ताकीदही राजला मिळाली.
"आम्ही, तुझे लग्न बिल्डर्स असोसिएशनचे सेक्रेटरी, आदित्य रांजेकरांच्या मुलीशी ठरविले आहे. तेव्हा त्या मिडलक्लास मुलीचा विचार डोक्यातून् काढून टाक. नाहीतर या प्रकरणात मला माझे बाकीचे सोर्सेस वापरावे लागतील." - डी.के. तावातावाने बोलत होते. राजला ही हेच अपेक्षित होतं त्यांच्याकडून. सुवर्णाताई हताश होऊन राजकडे पाहत होत्या.
आता... उद्या शाल्वी जायची होती परत. आजच राजला तिच्याशी बोलायचे होते.. काहीही करून. तो दिवसभर तिच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करत होता पण ती बहुतेक घरी नव्हती. शेवटी संध्याकाळी ६.०० वाजता फोनवर ती भेटली.
"हाय शाल्वी, राज बोलतोय" - राज.
"हा, बोल राज."- शाल्वी.
"अगं मी दिवसभर फोन लावत होतो.. पण.." - राज.
"अरे! मला उद्या न्यायसाठी बऱ्याच वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून मी आणि आई खरेदीसाठी गेलो होतो. आणि मग तिथूनच माझ्या आत्याकडे जेवायला गेलो. मी उद्या जाणार म्हणून तिने जेवायला बोलावले होते. बाबाही तिथेच होते ना.. त्यामुळे घरात कोणीच नव्हते." -शाल्वी.
"बरं तू आत्ता मला भेटू शकतेस का?" - राज.
"नाही रे, राज. खूप कंटाळा आला आहे हिंडून.. आणि मुख्य म्हणजे अजून् माझे पॅकिंग व्हायचे आहे. खूप सामान अजून भरायचे आहे. उद्या दुपारी १२.३० ची फ्लाईट आहे.म्हणजे घरातून मला कमीतकमी ८.०० वाजता तरी निघावे लागेल. या मुंबईच्या ट्रॅफिकमधून तिथे पोहोचायलाच ९.३० वाजतील. मग काय रिपोर्टिंगची वेळच होईल ना. प्लीज राज...." शाल्वी समजावत होती.
"तू कशी जाणार आहेस एअरपोर्टला?" - राज.
"टॅक्सिने.. अरे आईची तब्बेत् थोडी बिघडली आहे म्हणून मग मीच आई-बाबांना येऊ नका म्हटले एअरपोर्टवर. माझी मीच जाईन मग." -शाल्वी.
"हे बघ, मी येतो तुला सोडायला एअरपोर्टवर.. उद्या बरोबर पावणे आठ ला येतो तुला घ्यायला.. तयार राहा." - राज.
"अरे पण.. तुझे ऑफिस??? उगीच कशाला...." -शाल्वी.
"गप्प बस. उद्या येतोय मी तयार राहा." - राजला अधिकार वाणीने तिच्याशी बोलताना ऐकून शाल्वीला आश्चर्य वाटले...आणि खूप छानही वाटले. 'ठीक आहे.' म्हणून् तिने फोन बंद केला.
दुसर्यादिवशी सकाळी आवरून् ती राजची वाट पाहत बसल. इतक्यात तिच्या आत्याचा फोन आला. आत्याने तिच्यासाठी विणलेला स्वेटर काल शाल्वी तिथेच विसरली होती.. तो जाताजाता घेऊन जा असे आत्याने सांगितले.. तिला नाही म्हणवेना..जाताजाता येईन तो स्वेटर न्यायला असे तिने कबूल केले.
राजही सकाळी लवकर उठून् तयार झाला. तो बाहेर पडणार इतक्यात डी.के. नी हाक मारली... राज एकदम थांबला आणि डी.के. काय बोलतात याची वाट पाहू लागला.
पुढील भाग लवकरच देत आहे.....