पुण्याची पी एम् टी

कुठ्ल्याही स्टॉपवरी, गर्दीच गर्दी दिसती.
कुठलीही बस कायम, भरूनच का हो येती?
दारामधी माणसं, लटकती हो लोंबती,
तरीबी घाट्यातंच, कशी बया ही पी एम् टी?



सहा आसनी रिक्षा, जव्हा धावत व्हती,
तेवढ्याच पैशात तेवढंच, अंतर नेत व्हती.
रिक्षावाले ते चरितार्थ, त्यावरीच भागवती,
मग घाट्यात का जाते, फ़क्त तेवढी पी एम् टीच?


बस स्टॉपवर जाहिराती, बसवरती जाहिराती,
बसमध्ये जाहिराती, तिकीटामागे जाहिराती!
कधीतरी क्वचितच्, बस दिसते empty,
तरीबी घाट्यातंच, कशी बया ही पी एम् टी?



एका फ़ेरित बस समजा, १० कि.मी. धावती,
५० ऐवजी त्यातून, ७० प्रवासी जाती.
एका फ़ेरीचे असे किमान, ४०० रुपये जमती,
१० कि.मी. चा खर्च जाता, ३०० रुपये उरती!


एक बस दिवसामध्ये, १५ फ़ेऱ्या करती,
सारा खर्च जाऊनही, हजारो रुपये उरती!
जमा-खर्चात तरीबी, तोटा कसा हो दाखविती?
कुंपणच खातंय शेत, ओरबाडलीये पी एम् टी!!