खजुर रोल

  • १ वाटी खजुर(बीया काढुन) , १ किंवा पाऊण वाटी खवा
  • २ ते ३ टे. स्पून पिठीसाखर , सुकामेवा (प्रमाण आवडीनुसार )
  • डेझीकेटेड कोकोनट (रोल घोळवण्यापुरते)
४५ मिनिटे
१० ते १५ रोल

बीया काढलेला खजुर कढईत मऊ होईल इतका भाजा(नुसताच भाजा.तुप घालायचे नाही.) नंतर कढईत खवा घाला , हलवत रहा. त्यात थोडीशी साखर घाला.खजुर गोड असल्याने साखर कमी घातली तरी चालेल.यात सर्व सुकामेवा मिक्स करा.थोडे हलवा. मिश्रण एकजीव झाल्यावर  गॅस बंद करा.

 मिश्रण थोडेसे गार झाल्यावर पण पुर्ण गार होऊ न देता,थोडे गरम असतानाच त्याचा एक लांबट रोल करा. या रोलच्या वड्या कापा, नंतर डेझीकेटेड कोकोनटमध्ये घोळवा. आपले पौष्टीक खजुर रोल खायला तयार.

  • हिवाळ्यात हा पदार्थ अतीशय पौष्टीक आहेत.खजुर उष्ण असल्याने तो शक्यतो हिवाळ्यात खावा.
  • लहान मुलांना हा रोल खुप आवडेल,कारण हा रोल चवीला कोकोनट टॉफी सारखा लागतो.
  • जास्त दिवस टिकण्यासाठी हे रोल फ्रिजमध्ये ठेऊ शकता.( पण एकदा खाल्ल्यावर जास्त  दिवस राहतच नाहीत.)
मैत्रीण