माती,पाऊल,ठसे

मातीत चालली होती,ती तुझी पाउले ओली


पण माती माझी होती ओलेत्या पायाखाली


उमटले ठसे ते खोल,अन ओली झाली माती


तळपायानाही थोडी चिकटलीच माझी माती


मातीचे असेच होते,तुडवितात सारे तिजला


अन हरेक कण मातीचा आतून उरे भिजलेला


पण पायानाही आहे मातीची सलगी मोठी


जातात पाउले सारी ते ठसे ठेउनी पाठी !!