रे मना......

बन्ध असे सुटतांना


जीव नको हेलावू...


रात्र अशी ढळताना


नेत्र नको पाणावू...


हे असेच होणे हे


दैव जाण आपले,


कैफ़ाच्या झोकातच


क्षणभरास नाचले...


शब्दभान विसरुनी


विसावून बोलले,


अर्थ नको शोधू त्यात


दिवास्वप्न जागले...


परिघ असे आपुला


फ़सवाच सभोवार,


झीट येई द्रुष्टिला


होऊ नको हळुवार........


शीला.