काँबिनात्सिऑन

  • पाऊण वाटी चपटा पास्ता,पाऊण वाटी नळकांड्यांच्या आकाराचा पास्ता
  • ५० स्पॅगेटी काड्या,१ छोटा खोका २०० ग्रामचा अनव्हिप्ड क्रीम(श्लागझानं),पाव कप दूध
  • २५०ग्रामचा पिझ्झा टोमॅटोचा डबा किंवा ४,५ टोमॅटो उकडून,साल काढून
  • १मोठी वाटी भरून किसलेले चीज,मीठ,तेल
४५ मिनिटे
२ जणांना

बाजारात बऱ्याच प्रकारच्या स्पॅगेटी व पास्ता मिळतात त्यातील चपटा,नळकांड्याच्या आकाराचा,सर्पिल(twisted) इ.पैकी कोणतेही २ प्रकार निवडा.पातळ काड्यांची स्पॅगेटी घ्या. पास्ताप्रकार वेगवेगळे शिजवून घ्या, स्पॅगेटीही वेगळी शिजवून घ्या.
जाड बुडाच्या पातेल्यात पाणी उकळत ठेवा,त्यात १ चमचा मीठ व १ चमचा तेल घाला व एक प्रकारचा पास्ता घाला आणि शिजवा.
शिजल्यावर चाळणीवर घालून पाणी पूर्ण निथळू द्या.दुसरा पास्ता शिजला की पहिला प्रकार चाळणीतून ताटलीत काढा,म्हणजे तेवढ्या वेळात पाणी पूर्णपणे निथळेल.याच प्रकारे स्पॅगेटीही शिजवा.
दोन बेकिंग डिश मध्ये(लहान,साधारण ६ इंची)थोडे दूध घाला,त्यावर अनव्हिप्ड क्रीम घाला,थोडे टोमॅटो घाला.मीठ टोमॅटोमध्ये मिसळून घ्या म्हणजे सगळीकडे चांगले लागेल. त्यावर हे शिजवलेले पास्ताप्रकार पसरा,पुन्हा टोमॅटो व क्रीम घाला.किसलेले चीज घालून पूर्ण डिश झाका.
१८० ते २०० अंश सेंटिग्रेडवर २५ ते ३० मिनिटे बेक करा.

त्याच बेकिंग डिशमधून गरमगरम खा.हवे असल्यास वरून मीठ व मिरपूड घाला.

बेकिंग डिश मधून ताटलीत/वाडग्यात वाढणे जिकिरीचे होते म्हणून लहान बेकिंग डिश वापरा.त्याच बेकिंग डिशमधून खाणे सोयीचे होते.हा पदार्थ हाताने, चमच्याने खाणे शक्य नाही म्हणून काटा सुरी वापरा.

आले लसूण मिरचीचे वाटण टोमॅटोत मिसळून घातले तर ओळखीचा भारतीय स्वाद येतो.(हे आमचे पाकप्रयोग)

फिलिपो-बेल्ला कासा