यावे मला असे मरण....

यावे मला असे मरण....


तद् नंतर व्हावे माझे स्मरण !


आठवावे दोष माझे...


नि आठवावे माझे गुण !


दुःख अशांनाच व्हावे,


कि त्यांचे हृदयही रडावे,


मम अपराधांना स्मरूण तयांनी


क्षमेचे फूल देहावर वाहावे!


नकोत कुणाचे पोकळ अश्रू,


वरचे दुःख नि आतले हसू.


अशांनी कृपया येऊच नये,


मम आत्म्याला दुखवू नये!


अश्रू थोड्यांचेच


मला न्यायचे आहेत,


जन्मोजन्मी मनात


ठेवायचे आहेत!!


प्रीती