'माझी कविता'

मनातील चंचल विचारांची अन्


हृदयातील निःशब्द भावनांची,


तू शब्दरूपी आकृती!


तू पवित्र नि चैतन्यपूर्ण


विध्याधिदेवतेची तू पुत्री पावन!


 


एक ना अनेक तुझे साकारकर्ते;


तुला प्रसन्न करण्या कित्येकच झटले;


परि तुला का कुणी पूर्ण साकारले?


प्रयत्नांती परमेश्वर तयांनीच पाहिले,


जयांनी तवसाठी आयुष्य वाहिले!


 


मला न परि ते कधी शक्य झाले,


तरी तुला काही मागण्याचे


हे धारिष्ट्य मी केले,


 


"तुझ्या या सोज्वळ काव्यसृष्टीत,


एका तिमतिमत्या पणतीचे


स्थान मला देशील काय?


माझ्याच कल्पनांनी साकारलेली,


तू...'माझी  कविता' होशील काय?"


प्रीती