सांगेन पुन्हा कधीतरी...

सांगेन पुन्हा कधीतरी


मी किती किती तळमळलो,


तुला टाळताना प्रिये


मी किती किती जळलो..


   मी भांडलो तुझ्याशी


   मीपणाला माझ्या मी भुललो,


   काटा बनुन वाटेवरला


   माझ्याच पायात सललो...


       येताना डोळ्यात होते आसु


       मझ्याच पाउलात मी  असा अडखळलो,


       पुन्हा फ़िरुन मी प्रिये


       तुझ्याच कुशीत शिरलो.....


             सांगेन पुन्हा कधीतरी!