प्रितिसंगम.......

          आज आकाश मोकळं न हलकेही वाटू लागलय!मावळतीच्या क्षितिजाच्यावरही रंग भरू लागलेत.भैरवीचे परतीचे सूरही पाखरांच्या कंठी आळवू लागलेत.खळखळणाऱ्या सरीतेच्या अंतरी थिरकणारे तरंगही निश्चल बनू पहात आहेत. चित्त गुंगले आहे!मंद वहाणारा वारादेखिल दिशा बदलून झुळझुळतोय.....! अस्ताकडे जाण्यासाठीच अवघी सृष्टीच जणु धावते आहे अन मी या घडामोडींना अस्तापलीकडूनही पहातोय मुकपणे.......! आजहि या कृष्णे-कोयनेच्या संगमाला तुझी आस आहे. अंतरातून अलगद साद देत हलकेच लहरत ये या मंद वहाणाऱ्या शितल वाऱ्याच्या अलगुजी झुळूकीगत........


(शैल्य)