नुस्ता हिशेब

आयुष्यभर लिहीलेला जमा-खर्च,
चाळला एका संध्याकाळी
तेव्हा लक्षात आलं....
आता उरल्याय फक्त काही जुन्या डायऱ्या
अक्षरांनी भरलेल्या...
अन्‌ तसंच एक जुनं पेन, कुरकुरणारं...
विचार केला...
डायऱ्या चाळून घेऊ,
बघू सगळा हिशेब एकदा..
चाळल्यावर समजलं,
त्यातही बरीच पानं कोरी होती..