प्लम सुफले

  • २५० ग्राम डब्यातील प्लम,१ चहाचा चमचा बटर,२ अंडी,२ टे‌बल स्पून मैदा
  • १.५ चहाचा चमचा लिंबाची साल किसून,३ चहाचे चमचे वॅनिला अर्क/२ पाकिटे वॅनिला साखर
  • १५० ग्राम स्पाइझक्वार्क/चक्का/केफिर चीज/क्रीम चीज यापैकी जे उपलब्ध असेल ते.
  • १ टेबल स्पून साखर,१ चिमूट मीठ
४५ मिनिटे
३,४ जणांसाठी

बेकिंगट्रे/डिशला बटर लावून घेणे.प्लम्सचे अर्धे तुकडे करणे आणि त्यांना काट्याने टोचे मारणे व ते बेकिंग ट्रे मध्ये लावून घेणे.
एका वाडग्यात अंड्यातील पांढरे,१ चिमूट मीठ,वॅनिला अर्क/साखर एकत्र करणे व हँडमिक्सीने इतके फेटणे की त्याचा पांढरा फोम बनला पाहिजे.(याला आयश्ने म्हणतात.)भरपूर फेटावे लागते.
दुसऱ्या वाडग्यात अंड्यातील पिवळे व पांढरे वेगळे करणे.क्वार्क,अंड्यातील पिवळा बलक,मैदा,लिंबाची किसलेली साल,साखर एकत्र करणे व हँडमिक्सीने चांगले फेटणे.
या मिश्रणात वरील आयश्ने घालणे व न फेटता फक्त एकत्र करणे. हे मिश्रण प्लम्स वर घालणे.
प्रिहिटेड अवन मध्ये २५-२७  मिनिटे १८०अंशावर बेक करणे.
गरम/गार/कोमट जसे हवे तसे खाणे.

आयश्ने: आय=अंडे, श्ने= हिम

त्सेंटा आजी