अपुलं जीवन नि:स्वार्थी
बनवता आलं पाहिजे
दुसरयासाठी शरीरास
झिजवता आलं पाहिजे.
पदरी असलेल्या सुखास
पसरवता यायला हवं
दु:ख लाभलं तरी ते
पचवता आलं पाहिजे.
मिळवावं सारं काही
अडकून मात्र पडू नये
आपल्यजवळील सारं
वाटता आलं पाहिजे.
मिळत असेल आपल्याला
पोट भरून खाण्यास तर
भुकेलेल्यास चार घास
भरवता आलं पाहिजे.
हसता हसता कधी कधी
रडताही यायला हवं
रडतानाही इतरांना
हसवता आलं पाहिजे.
फुलवत आपण नसू फुलं
झाडं, बागा, फळं तरी
गालांवरील आसवांस
फुलवता आलं पाहिजे.
जगणं कसंही असू दे
ते जगता यायला हवं
मरतानाही दुसरयाला
जगवता आलं पाहिजे.
-------------- शतानंद.