हल्ली काही बाही ऐकू येत मला

हल्ली काही बाही ऐकू येत मला
म्हणजे बघ हं.....
न वाजणारा फोन,
दारावर तू न मारलेली थाप
आणि
चुकूनच का होईना,
माझ्यासाठी चुकलेला तुझ्या काळजाचा ठोकाही
खरंच,
हल्ली काही बाही ऐकू येत मला

श्यामली!!!