नाजुक धागे

तोडावं म्हणलं तरी
चटकन तुटत नाहीत
हे असले नाजुक धागे..

कुठुन आणतात कळेना
हा नसता चिवटपणा
हे असले नाजुन धागे..

ओढ लावुन धरतात
ताणातही टिकुन राहतात
हे असले नाजुक धागे..