घुसमट

जीवाची असह्य घुसमट

तग कसा धरू

मनातील कप्प्याकप्प्यात

दु:ख कसे दडवू

ओल्या हळव्या पापण्यात

कढ कसे जीरवू

ल्यालेल्या शेकडो मुखवट्यात

खरे कधी बोलू

सुखाने हासणाऱ्या हुंदक्यात

अंतरीची आग कशी विझवू