४ जुलै हा दिवस अमेरिकेत स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. आतिशबाजी (Fire Works) हा एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम असतो. बोस्टन ला असताना चार्ल्स नदीवर होणारी आतिशबाजी पाहण्याचा योग आला. तो फटाक्यांचा नयनरम्य सोहळा पाहून या ओळी सुचल्या..
लक्ष लक्ष चांदण्यांचा खेळ नभी रंगला,
इंद्रधनूच्या रंगातूनी प्रकाश इथे सांडला..
एका मागूनी एक येऊनी सडा आकाशी शिंपला,
फेर धरूनी चांदण्यांनी डाव इथे मांडला.....
- प्राजु.