मसाले(काळा) भात

  • १ वाटी जुना तांदूळ
  • १ टॆ.स्पून गोडा मसाला
  • सिमला मिराची
  • फ्लावर
  • वांगी
  • मटार
  • ४ हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन
  • अख्खा मसाला(तमालपत्र,मसालावेलाची,दालचिनी,मिरी,लवंग)हिंग,हळद,धणे-जिरे पावडर
  • मीठ,साखर,तेल
  • १ वाटी तांदूळाला ३१/२ वाट्या गरम पाणी
३० मिनिटे
२ जणांसाठी

प्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवावे. नंतर एका पातेल्यात तेल घ्यावे(पातेल्याचे तळ बुडेल इतके तेल) आणि तेल तापल्यावर त्यात प्रथम हिंग व हळद घाला. नंतर सर्व अख्खा मसाला घालून परता. मग त्यात एकेक करुन सर्व भाज्या वेगवेगळ्या तळून बाजूला काढून घ्या. नंतर त्या तेलातच धुवून ठेवलेला तांदूळ चांगला परतून घ्या. परततानाच त्यात मिरच्या घाला. नंतर तांदूळ चांगला परतल्यावर त्यात आधी तळून घेतलेल्या सर्व भाज्या घाला व परत चांगले परतून घ्या. मग त्यात एक चमचा धने-जिरे पावडर घाला व ३ १/२ वाटया गरम पाणी घाला. पाणी घालतेवेळी गॅस मोठा ठेवा. नंतर गोडा मसाला, मीठ व थोडिशी साखर घालून चांगले एकत्र करा. नंतर गॅस मंद करा व पातेल्याखाली तवा ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे.

मठ्ठा आणि जिलेबी बरोबर हा भात अप्रतिम लागतो. लग्नकार्याच्या जेवणात हा भात सर्रास केला जातो.

प्रतिक्रिया जरूर कळवा!  

नाहीत

नणंद