नविन कोऱ्या करकरीत मनोगताला कवितांचा मारा व भारा जर सहन होत असेल....
तर भरल्या गाड्याला हे चिपाडेचे ओझे कुठून होणार ?
एक कविता आमचीही....
बालपणी आजीच्या तोंडून ऐकली होती
आज रसिकांसाठी परत येथे देत आहे....
कवी मी नाही हे सांगणे न लगे
************************
एक होती म्हातारी,
जाई लेकीच्या घरी.....
काठी टेकत टेकत चाले
चाले जंगलातून
हो चाले जंगलातून-
तिकडून आले वाघोबा,
कोल्होबा अन् लांडगोबा,
म्हणू लागले म्हातारीला
खाऊ का तुला..... मी,
खाऊ का तुला-
म्हातारी मग घाबरली
थरथर कापू लागली
म्हणू लागली वाघोबाला
नको रे बाबा
तू खाऊ नको मला.....
"लेकी कडे जाऊन येते
शिरापुरी खाऊन येते
जाड जुड होऊन येते
मग खुशाल खा मला
मग खुशाल खा मला......."
वाघोबा ते खुश जाहले,
मनी स्वप्ने बघू लागले...
कोल्होबा अन लांडगोबा
पण सामील हो त्याला
हो...सामील हो त्याला.....
वाघोबा म्हातारीला म्हणाले.... "ए म्हातारे, लवकर जा लेकीकडे, शीरापुरी खाउन
(नाहीतर कट्ट्यावर श्रीखंड पुरी खाउन) चांगली जाड जुड होऊन परत ये - मला खुप खुप भुक लागलीय "
"हो हो आम्हालाही भुक लागलीये " कोल्होबा अन् लांडगोबा बोलले.
मग म्हातारी गेली लेकीकडे- तिकडे तीने ३ महिने काढले व चांगली जाड जुड होऊन घरी परत जायला निघाली...
इतक्यात तिला आठवले की, रस्त्यात जंगल आहे, जंगलात वाघ आपली वाट बघत असेल.... तीने ही गोष्ट लेकीला सांगीतली
"आई काळजी नको करूस, मी आजच मोठ्ठा जादूचा भोपळा काढलाय.... त्याच्यात बसून तू जा मग वाघोबा, कोल्होबा व लांडगोब तुला बघूच नाही शकणार. भोपळ्याला सांगायचे 'चल रे भोपळ्य टुणूक टुणूक' मग भोपळा धावायला लागतो...
म्हातारी मग निघाली. वाटेत तेच जंगल लागले, तेच वाघोबा, कोल्होबा अन लांडगोबा भेटले.
"ए म्हातारे, कुठे निघालीस..... थांब " वाघोबा ओरडले.
म्हातारी मोठ्याने म्हणाली,
"म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक,
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक "
बघते तर काय भोपळा उड्या मारीत धावू लागला...
भोपळ्याला धावताना बघून वाघोबा, कोल्होबा व लांडगोबा चकीत झाले.
तेही भोपळ्याच्या मागे धावू लागले.
वाघोबा ओरडला, "ए म्हातारे थांब"
म्हातारी म्हणाली,
"म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक,
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक "
भोपळा जोर जोरात धावायला लागला.....
कोहोबा म्हणाला,
"ए म्हातारे थांब"
म्हातारी म्हणाली,
"म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक,
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक "
भोपळा अजून जोर जोरात धावायला लागला.....
मग काय कोल्होबाही त्याच्या मागे पळू लागला,
आणि लांडागोबाही पळू लागले...
धावता धावता भोपळ्याला दिसली सर्कस,
भोपळा घुसला तंबुत सर्कस बघायला...
त्यात बसलेली म्हातारी व तिला खायला आलेले
वाघोबा, कोल्होबा अन् लांडगोबाही घुसले सर्कशीत...
भोपळा अडकला रिगणात,
अन मास्टर आला अंगणात....
त्याने धरले सर्वांना....
कोल्होबा अन वाघोबांना.
तेव्हा पासून मुलांनो
म्हातारी म्हणते भोपळ्याला
"चल रे भोपळ्या टुणूक टुणूक "
"चल रे भोपळ्या टुणूक टुणूक "
"चल रे भोपळ्या टुणूक टुणूक "
अवांतर : ही कविता चालीत, लयीत व हावभावांसह म्हणता व वाचता येते !