तुझ्या एका हाकेसाठी...

पद्मजा फेणाणी जोगळेकरांची गाणी मला आवडतात-
अशीच त्यांच्या गाण्यांची एक जुनी चकती मिळाली...
ह्यातली काही गाणी पूर्वी काही वेळा ऐकण्यात आलेली होतीच पण एका मित्राने "तुझ्या एका हाकेसाठी...." ही कविता पद्मजांच्या आवाजात ऐक असे सुचवले.
ही कविता अत्यंत आवडली-
आपल्या सर्वांसोबत त्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी येथे देत आहे. 
कविता श्री. यशवंत देवांची आहे.
"ही शुभ्र फुलांची ज्वाला" ह्या काव्यरचना "फाउंटन" ह्या संगीतसंस्थेने प्रकाशित केली आहे.

कविता हा माझा प्रांत नाही हे प्रांजळपणे कबुल करीत ह्या कवितेचे रसवर्णन/रसग्रहण कोणी केल्यास दुधात साखर पडेल असे वाटते. (केशवसुमारांनी विडंबन टाकायलाही हरकत नाही winking)
***********
तुझ्या एका हाकेसाठी,
किती बघावी ही वाट.....
माझी अधिरता मोठी
तुझे मौन ही अफाट.....

तुझ्या एका हाकेसाठी,
उभी कधीची दारात,
तुझी चाहूलही नाही,
होते माझीच वरात....

तुझ्या एका हाकेसाठी,
हाक मीच का घालावी ?
सात सुरांची आरास,
मीच मांडून मोडावी.....

आले दिशा ओलांडून,
दिली सोडून रहाटी.....
दंगा दारात हा माझा,
तुझ्या एका हाकेसाठी......

तुझ्या एका हाकेसाठी,
किती बघावी ही वाट.....
माझी अधिरता मोठी
तुझे मौन ही अफाट.....

ह्या कवितेचा आस्वाद येथे  घेता येईल.