माझा पाऊस थेंबाथेंबांचा
पानापानातून ओघळतो..
मंतरलेल्या म्रुदगंधावर,
पाऊस पुन्हापुन्हा भाळतो...
माझा पाऊस झिरमिर झिरमिर,
आडव्या उभ्या रेघांचा..
पाऊस धडधड गडगड,
पाऊस सावळ्या मेघांचा...
माझा पाऊस बेभान बेभान,
चराचराला खुलवतो..
त्रुप्त परिणित धरेला,
नित अदांनी भुलवतो....
माझा पाऊस निपचिप निजलेला,
दाट धुक्याची गात्र.....
आसमंती दरवळलेली,
जशी धुंद निशिगंधी रात्र....
-- प्राजु