श्वास असे संपता संपता
धुसर नजरेत येशील तू
नि:शब्द.....
हाती हात धरुन घट्ट
चालताना ही दुरची वाट
आणि
सहज सुटणार नाही तळव्यावरील
तूझी अनावर पकड
माझ्या थंड स्पर्शाने.......
पहात रहाशील नजरेत माझ्या
स्तब्धतेने आरपार
भेदुन जातील जाणिवांना
डोळ्यांतील महापूर,
फ़ुलतील मग स्पर्शातून
लाख लाख मयुरपंख,
एकेका आठवणींची चिरंतर दालने
खुलत जातील दुरवर तुला मला बघता बघता........
क्षीण होता सांध्य-पर्व
क्षितिजाच्या रांगोळीच
नको ना ग ओलावूस कातर होत नेत्रांना
आवर आता पूर हा.... सावर ना ग मना
पहा जिथे छाया आहे,प्रकाशही असतो ना.........!
शीला.