एक कविता..

एक कविता असते मनात
अशीच मनाला भीडणारी,
तिच्या केसांबरोबर उगाचवार्यावर उडणारी..

आपला तोल जाताना असते    
ती कविता सावरणारी,

तिच्या डोळ्यात पाहताना    
कविता उगाच बावरणारी..

आपला सारा गोंधळ पाहुन          
असते कविता आपल्यावरच हसणारी....