का तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठी
का असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी
भुललो ना मी कधी कोणत्याच अमिषाला
दिला होता तुला 'तो' शब्द पाळण्यासाठी
वाचले असतेस तु कधी पान माझ्या मनाचे
नसता उशीर झाला हे तुला कळण्यासाठी
जिंकल्यावर संपला असता डाव हा कधीचा
मुद्दाम हारलो होतो, पुन्हा खेळण्यासाठी
रक्ताळल्या बोटांनी पुन्हा छेडतो तारा
जे कधी लागले नव्हते सुर ते जुळण्यासाठी