शिक्षा

मी तुझ्याकडे घेऊन
आलो होतो फिर्याद
माझ्यावर तू खूप
अन्याय करते आहेस
तुझ्या न्यायालयी
तुझ्या निकालावर
तुझाच आरोपी
तुला विनंती करतोय
फक्त एकदा बघ
माझ्या नजरेनी
आणि मग दे
तुझा अंतिम न्याय
तू देशील ती शिक्षा
मला प्राक्तना प्रमाणे
मान्य आहे..