पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात गिरिभ्रमण : सुधागड

या पौर्णीमेला रात्री चंद्रप्रकाशात गिरिभ्रमण करण्याचा बेत आहे. मुंबई व पुण्याच्या लोकांना येता येईल असे ठिकाण आहे सुधागड. श्रेणी : सोपी.

कार्यक्रम पुढीलप्रमाणे

पुण्याहून सायंकाळी सहा वाजता निघून रात्री दहा वाजेपर्यंत अष्टविनायकासाठी प्रसिद्ध अशा पालीजवळील पाच्छापूर- ठाकूरवाडी येथे पोहोचणे. मुंबईहून कोणी येणार असल्यास त्यांनीही दहा वाजेपर्यंत थेट पोहोचणे.
रात्री दहा ते बारा सुधागडावर चढाई.   छोटीशी होळी, नंतर गडावर फेरफटका आणि मग पंतसचिव वाड्यात अथवा देवळात मुक्काम.
पहाटे उठुन गडप्रदक्षिणा, टकमक टोक, प्रतिध्वनी चाचणी, तेलबैला दर्शन आणि तीन वाजेपर्यंत पायथ्याला उतरणे.
सायंकाळी सात वाजेपर्यंत पुण्याला परत.

प्रवासखर्च: अंदाजे तीनशे रुपये.
बरोबर आणण्याच्या वस्तू : गिरिभ्रमणास योग्य असे कपडे, शूज अत्यावश्यक. तीन बाटल्या पाणी. एक वेळेचे जेवण व नाश्ता याला पुरेल असे पदार्थ. उत्तम विजेरी, अंथरूण, पांघरूण, टोपी.
बरोबर न आणण्याच्या वस्तू: दागिने, रेडिओ वा टेपरेकॉर्डर,दारू, सिगारेट, तंबाखू.

सहभाग

वय वर्षे १८ पेक्षा मोठे कोणीही. तीन मुले आणि दोन मुली असा पाच जणांचा गट नक्की जाणार आहे. अजून कोणी येणार असेल तर स्वागत आहे. आपल्या दूरध्वनी क्रमांकासह संपर्क साधावा.