पेच काल आमच्या काही चिंताक्रान्त गझलकार मित्रांनी आमच्या निदर्शनास आणला. बिचाऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले होते. कारकून म्हणतात :
शराब कबाब शेरात नको
प्रतिसादीही पेचात नको
त्यांचे हे म्हणणे मान्य केलास ९९% शायरांना आपले दुकान कायमचे बंद करावे लागेल ह्याचा केला आहे काय? तेव्हा त्यांच्यापुढे तमाम गझलकारांची कैफ़ियत मांडून आम्ही त्यांना आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याची नम्र विनंती करत आहोत. खालील शब्द जरी आमचे असले तरी भावना तमाम शायरवृंदाच्या आहेत.
गझलेत शराब, कबाब नको ?
उद्या म्हणाल शबाब नको !
देई अर्थ जी जगण्याला
तीच नेमकी बाब नको ?!
गझलेला ऋग्वेदाचा
पीतांबरी हिज़ाब नको
लक्ष्यार्थाशी दोस्ती कर
अभिधेचाच रुबाब नको
'खोडसाळ' व्हा दोस्तांनो
उगा सोवळी आब नको
(व्यक्तिगत स्वरूपाचे वाटलेले संदर्भ काढून टाकलेले आहेत : प्रशासक)