अलिप्त झंकार

पहा कधीची मागे पडली
ती गावाची वेस
दूर सारले नूपुर बोलके
मनी भेटीची ओढ

आता तरी दाखवशील ना?
तव दग्ध भगव्या वाटा?
कोण तू? कुठे आहेस तू?

फुलाविना गंध कोणता?
दळवते मीच
सूर नसून गीत कोणते?
झंकारते मीच

तू कोण? कोण मी?
सभोवतीचे जग कोण?
अद्वैताच्या हिंदोळ्यावर
अलिप्त मुकुल कोण?