जाणत्या राजाला मानाचा मुजरा......

निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥
यशवन्त, किर्तीवन्त। सामर्थ्यवन्त, वरदवन्त ।
पुण्यवन्त, नितीवन्त । जाणता राजा ॥

शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप । भुमंडळी ॥
शिवरायांचे कैसे बोलणें । शिवरायांचे कैसे चालणें ।
शिवरायांचे सलगी देणें । कैसे असे ॥

सकळ सुखांचा केला त्याग । करूनि साधिजे तो योग ।
राज्यसाधनाची लगबग । कैसी केली ॥

-रामदास.

हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपतींना विनम्र वंदन !