आंतरराष्ट्रीय महिला दिन

आज आंतरराष्ट्रीयहिला दिन! समस्त महिला वर्गाला शुभेच्छा! या निमित्ताने वाचनात आलेले हे संभाषण पहा.
लेखिका: सौ.आशा बापट

आंतरराष्ट्रीय महिला दिन

"आता फक्त एक तास राहिला हं" ८ मार्चला घड्याळाकसे बघत तो म्हणाला  "मग माझा मी नेहमी सारखा"

" खूप त्रास होतो नं या दिवसाचा' ती समजून घेत म्हणाली "पण काळ काढ ना थोडीशी. फक्त आजचाच दिवस माझा,बाकी सारे तुझेच ना!"

मग उदारपणे तो म्हणाला 'ठीक आहे, पण हे मात्र नक्की हं. फक्त एक दिवस तुला दिला, बाकी ३६४ मात्र माझे."

ती खट्याळपणे हसून म्हणाली 'लिप वर्षाच्या एका दिवसाचे काय?"

तो अडख़ळला. चिडून म्हणाला 'तू तुझा ना माझा'

"किती छान" तिने गिरकी घेतली. ' तो दिवस खरा असेल, तेंव्हा ना तुझ्यावर पुरूषपणाची सक्ती, ना माझ्यावर स्त्रीत्वाची बंधने."

तो म्हणाला "दर तीन वर्षानी एक दिवस जास्तीचा काढीन कसा तरी."

ती म्हणाली "दर तीन वर्षानी येणाऱ्या त्या दिवसासाठीच जगेन मी तरी!"

*****

(जयन्ता५२)