स्वप्न

स्वप्नांच्या राज्यात
गंधाळलेल्या मनात
एक स्वप्न
दोघांनी
पाहिलेल

एक स्वप्न
हिंदोळ्यावर
हलणार

एक स्वप्न
पापण्यात
हसलेल

एक स्वप्न
स्वप्नाला
पडलेल

एक स्वप्न
स्वप्नवाटा
शोधणार...

एक स्वप्न
स्वप्नाने
छेडलेल

अशा स्वप्नांच्या राज्यात
गंधाळलेल्या मनात
एक स्वप्न
भंगलेल