वलय

वलय
मागोमाग निघालेल्या
मेंढरांना नवा रस्ता दाखवला
तरी कळतच नाही.

त्याच त्या वाटेवर जाऊन
धडपडण्यातला आनंद 
तो  त्यांनाच ठाऊक !

वेगळा वाटाड्या पाहून
हसतात ती मोठ्याने
आपल्याच तोऱ्यात

वाटाड्या ही निघून जातो
ठेवून त्यांना त्या वलयात;
अज्ञानाच्या गळफासात