पांचाली

पुरे आतल्याआत धुमसत राहाणे 
झुरत कुजत जगणे
सोलून काढ
अप्रिय आठवणींचे पदर

विझव तापलेल्या लाटा
आसवातून झरणाऱ्या  
रक्तातील व्यथेने

मात्र

सोड मढ्यागत रहाणे
आता व्यथेचे शस्त्र कर
अशी पांचाली हो!