जी. ए.

जीएंच्या कथा वाचून
माझ्याही मनाचे वेटोळे
उलगडू लागले
सप्तपाताळात पुरलेल्या
इच्छास्वामींच्या कवट्यांचे
अाकर्ण हास्य दिसू लागले
वेदनागुहांच्या कट्टर अंधारात
दुःखाचे कंगोरे घासू लागले
दैवाने मिळालेले खुशजीभ
जीवनही अळणी वाटू लागले
सत्याच्या शोधात अापणही एक
यात्रिक व्हावेसे वाटू लागले
पिंगळावेळच्या वाचनाने
काजळमायेचे डोह खुणावु लागले !!
                      - केशव काळे