इथे ओशाळला गोबेल्स!

आजची ताजी बातमी: श्री. भट्टाचार्य यांच्या "स्वातंत्र्य लढ्यात नेताजींचे स्थान काय?" ह्या माहिती अधिकारा अंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला गृहखात्याने निर्लज्ज उत्तर दिले आहे - "नेताजी देशभक्त असल्याचा कोणताही पुरावा सरकारकडे नाही!"

पहिला टप्पा: स्वातंत्र्यपूर्व काळात समस्त क्रांतीकारकांची निर्भत्सना व त्यांच्या देशभक्ति विषयी शंका घेत जनमानसात त्यांची चुकिची प्रतिमा निर्माण करणे.

दुसरा टप्पा: स्वातंत्र्योत्तर काळात संपूर्ण शालेय शिक्षणक्रमात गांधी-नेहेरू व त्यांचे अनुयायी यांचाच देशभक्त असा परिचय करून बहुतांश पाठ्यपुस्तके यांच्याच कथांनी भरून उरलेल्या दोन-चार पानांत क्रांतीकारकांची बोळवण करणे.

तिसरा टप्पा: क्रांतीकारक हे दहशतवादी असल्याचा पद्धतशीर प्रचार - बालपणापासून हे मुलांच्या म्हणजेच भावी नागरिकांच्या मनात ठसवण्यासाठी.

अंतिम टप्पा: क्रांतीकारक देशभक्त होते हेच नाकारून त्यांची नावे इतिहासातून पुसून टाकायचा मनसुबा, सुरूवात नेताजींपासून झाली आहे!

इथे ओशाळला गोबेल्स!