अलिप्त

ह्या इथे,
काळजावर कश्या आवळल्या जाताहेत
असह्य आठवणींच्या असंख्य गाठी…

आणि तिथे,
पिवळ्याधमक चाफ्याची फुलं गुंफलेल्या
तुझ्या वेणीची वीण
कशी सैल…सैल होतेय–
तुझ्या अलिप्त घरावरून वाहणा-या
माझ्या निसटत्या श्वासाच्या
निसटत्या स्पर्शानेसुद्धा!