ज्यांना आपण जवळचे मानतो त्यांना आपण खरोखरच जवळचे वाटतो का ?
प्रियजनांचे कुशल पुसावे
तयांच्या सुखदु:खी समरस व्हावे
तयांचे मनोगत जाणावे
प्रसंगी डोळाभरी दर्शन व्हावे
ही भाबडी आंस ठेवून जगावे
तो एक मूर्ख !
आप्तांचे अंतरंग न कळावे
तयांसी आपुले आस्तित्व नसावे
तयांच्या विश्वै आपण नसावे
हे परि उशीरा कळावे
तो शतमूर्ख !!
परस्वभावे आकलन न व्हावे
अनाठायी संवेदनशील असावे
कालगतीस समयी न ओळखावे
स्वत: कुणाची अडचण व्हावे
तो महामूर्ख !!!