१० लाख हस्तलिखितांचा खजिना

इ-सकाळने http://www.namami.org/ १० लाख हस्तलिखितांचा खजिना ऑनलाइन स्वरूपात खुला झाल्याची बातमी दिली आहे.दैनिक सकाळ म्हणते-- "भारताने आज १० लाख हस्तलिखितांचा "कीर्तिसंपदा' हा इलेक्‍ट्रॉनिक डाटाबेस तयार करून विश्‍वविक्रम नोंदविला आहे. या डाटाबेसमध्ये कौटिल्याचे अर्थशास्त्र, गीतगोविंद व बाबरनामा यांसारख्या प्राचीन ग्रंथांचाही समावेश आहे." ...... पर्यटन व सांस्कृतिक कार्यमंत्री अंबिका सोनी यांनी, "ही सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखी घटना आहे,' असे या डाटाबेसच्या उद्‌घाटन प्रसंगी येथे सांगितल्याचे दैनिक सकाळ म्हणते, त्यामध्ये पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील पाच हस्तलिखितांचा समावेश असल्याचेही दैनिक सकाळ नमूद करते. "नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट' या संस्थेने तयार केलेला हा डाटाबेस http://www.namami.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे