'स्वरम्' प्रस्तुत पहिला कार्यक्रम "लॉली-पॉप"

'स्वरम्' या नवीन सुरु होणाऱ्या संस्थेविषयी -

'स्वरम्'

संगीत ही मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग असणारी कला आहे. समाजातील प्रत्येक घटक कोणत्या ना कोणत्या प्रकारे संगीताशी निगडीत असतोच. अशा संगीतावर मनापासून प्रेम करणाऱ्या समाजातील सर्व घटकांना त्यांच्या अभिव्यक्तीसाठी, सांगितीक वृद्धीसाठी एक व्यासपीठ असावे या हेतूने 'स्वरम्' या संस्थेची निर्मिती केली आहे.

सध्या सुरुवातीच्या काळात 'पुणे शहर व परिसर' हे 'स्वरम्' चे कार्यक्षेत्र आहे. या अंतर्गत पुणे शहरामध्ये विविध उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे. यामध्ये विविध सांगितीक कार्यक्रम, संगीत कार्यशाळा, चर्चासत्रे, मान्यवरांची व्याख्याने अशा स्वरुपाचे वैविध्यपूर्ण उपक्रम अंतर्भूत आहेत. अशा पद्ध्तीची संस्थात्मक रचना करण्यामागे विखुरलेल्या संगीत प्रक्रियांना एकजिनसी करण्याचा आमचा हेतू आहे.

संगीताशी निगडीत सर्व गोष्टींवर सखोल चर्चा व्हाव्यात, अनेक प्रक्रियांचा उहापोह करता यावा, संगीताद्वारे स्वतःला व्यक्त करु पाहणाऱ्या अनेक नवोदितांना तज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे  असा आमचा उद्देश आहे, म्हणूनच संस्थेचे सभासदत्व नि:शुल्क असावे असा आमचा प्रयत्न आहे. नैसर्गिक गुणवत्ता असलेल्या, परंतु योग्य मार्गदर्शनाचा अभाव असलेल्या नव्या उमेदीच्या कलाकारांना व्यावसायिक स्तरावर वाव देण्यासाठीही 'स्वरम्' प्रयत्नशील राहीलच.

पुढील वर्षामध्ये वाद्यवृंद संयोजन, गायन आणि वादनातील बारकावे, व्हॉइस कल्चर या व अशा इतर अनेक बाबींवर मान्यवरांची चर्चासत्रे, कार्यक्रम व व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. तसेच 'स्वरम्' च्या कलाकारांतर्फे वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती केली जाणार आहे.

"लॉली-पॉप" या कार्यक्रमाविषयी -

"लॉली-पॉप" या कार्यक्रमाने 'स्वरम्' या संस्थेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल. "लॉली-पॉप" या कार्यक्रमाअंतर्गत गेल्या १० वर्षांतील प्रसिद्ध हिंदी-मराठी गाणी पुण्यातील आघाडीचे गायक व वादक कलाकार सादर करतील. याशिवाय यामध्ये ए. आर. रेहमान, इस्माईल दरबार, शंकर-एहसान-लॉय आणि अनु मलिक इत्यादिंसारख्या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकांच्या गाण्यांचा समावेश असेल. सर्व गाणी ही मूळ चालीतच वाजविली जातील, रिमिक्स गाण्यांचा कार्यक्रमात समावेश नसेल.

कार्यक्रमाची तारीख व वेळ -

रविवार दि. ६ मे, २००७, सायंकाळी ५ ते ८

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे.

कार्यक्रमाच्या तिकिटांसाठी संपर्क -

चैतन्य - ९८९०७५३३८६

निखिल - ९८६०४३६५५६

सवित्र - ९८२३४६०१९९

याशिवाय तिकीटे कार्यक्रमाआधी १ दिवस नाट्यगृहावर मिळतील.

याविषयीची माहिती कार्यक्रम विभागात लवकरच प्रकाशित केली जाईल.